https://



I


Image from 

www.google.com/search? 

q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8+%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&tbm=isch&hl=hi&prmd=inv&sa=X&ved=2ahUKEwjt_sCgo8v9AhVWnNgFHfqyB8AQrNwCKAB6BQgBELAC&biw=360&bih=668#imgrc=WX5T-0DHu4XwxM&lnspr=W10=

*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

*जागतिक महिला दिन  2023*

*'Embrace Equity'*


 या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'Embrace Equity' 

अशी आहे. याचा अ‌र्थ.

 लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करणे.


*जागतिक महिला दिनाची माहिती *

दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो.

या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन असेही म्हटले जाते.

पहिला महिला दिवस 28 फेब्रुवारी 1909 या दिवशी न्यू यार्क येथे साजरा करण्यात आला असला तरीही आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार जागतिक महिला दिन हा 8 मार्च या दिवशी निश्चित करण्यात आला.

पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही १९०७ साली स्टुटगार्ड या ठिकाणी भरली.

पुढे न्यू यार्क मध्ये ८ मार्च १९०८ रोजी वस्त्रोद्योगातील अनेक स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात मिळून ऐतिहासिक निदर्शने करून दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या.

या मागण्यांबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष प्रौढ स्त्री-पुरुषां अशा सर्वांना मतदानाचा हक्क मिळावा अशीही मागणी करण्यात आली.

महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो

स्त्रियांच्या या कृतीमुळे व स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ  १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा जो ठराव क्लारा ने मांडला, तो पास झाला.

बल्गेरिया आणि रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्या भारत देशात मुंबई येथे  ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ मध्ये पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला.

पुढे युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात साजरा होऊ लागला आहे.

हा दिवस अभिमानाचा दिवस असतो. विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, माता जिजाऊ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.

दरवर्षी महिला दिन साजरा करत असताना एक थीम बनवली जाते. महिला दिन साजरा करत असताना पहिली थीम ही सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवण्यात आली होती.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog