मराठी भाषा गौरव दिन

 


          


                   Picture from https://www.adda247.com/mr/jobs/marathi-bhasha-gaurav-din-2022/




       *मायबोलीच्या अभिमानाची*

 

        *_ज्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची गगन भरारी एवढी की 'इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने अंतराळातील ताऱ्याला 'कुसुमाग्रज तारा' असे नाव दिले, अशा 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्या.. पद्मभूषण 'कुसुमाग्रज' यांचा आज जन्मदिवस अर्थात.. 'मराठी भाषा गौरव दिन'_*


        *अमृताते पैजा जिंकू शकणारी मराठी भाषा जी संस्कार शिकवते. ज्यामध्ये हृदये जोडणारा जिव्हाळा.. आत्मियता.. आपुलकी.. माणुसकी आहे. या संस्कारी भाषेमुळे मराठी माणूसही संस्कृतीप्रेमी, धार्मिक वृत्तीचा.. संस्कारी.. प्रेमळ.. पापभीरु अशी जगात मराठी माणसाची ओळख दृढ आहे.*

        *ज्ञानोबा, तुकोबा.. नामदेव, रामदास स्वामी अशा संतपरंपरेने चिरंतन असे जीवनावश्यक ज्ञानभंडार मराठीत उपलब्ध केलेय. मराठीची अमृतमय गंगा शेकडो बोलीभाषेला सामावून निरंतर प्रवाही आहे. हे अमृत प्राशन करणारे इतिहास घडवीत आहेत. मराठी जगाला केवळ बंधुभावच शिकवतच नाही तर मराठी जनांच्या नित्य व्यवहारात त्याचे प्रत्यंतर येते. "माय" या शब्दाचा विशाल अर्थ.. उदात्त भाव सांगितला तो मराठी भाषेनेच.* 

        *इतिहास.. अध्यात्म.. विज्ञान असे सर्वच विषयाचे ज्ञान मराठीत उपलब्ध आहे. ही भाषा हृदयातील भाव सांगते. सहिष्णु मराठी भाषेने देशातील सर्वच भाषेशी भावनिक ऋणानुबंधाचे नाते निर्माण केलेय म्हणूनच आम्ही मराठी भाषिक आहोत यासाठी भाग्यवान समजतो. "मी मराठी" हा अस्मितेचा नाही तर आत्मगौरवाचा.. अभिमानाचा विषय आहे.*

        *मराठी भाषेची जगाला खरी ओळख झाली ती पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराने. त्यांनी मराठी भाषेवर झालेले अरबी.. फारसी भाषेचे आक्रमण मोडून काढत राज्यकारभारात मराठीला स्थान दिले. यामुळे नित्य व्यवहाराची ही भाषा राजभाषा झाली. पूढे याच परंपरेने मराठी हीच राज्यकारभारात.. व्यवहारात केंद्रस्थानी झाली. पण पूढे इंग्रजी शासन आले. तेव्हा त्याच्या इंग्रजी शब्दांची मिरासदारी मोडण्यासाठी स्वा. सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत शब्दभंडार उपलब्ध करुन दिले. आजही अनेक प्रदेश आणि विदेशातही मराठी भाषा अभिमानाने बोलली जाते.*

        *विश्व कल्याणासाठी पसायदान मागणारी ही जगातील एकमेव अशी वैभवी आमची मराठी भाषा. चौदा विद्या.. चौसष्ट कलांना कवेत घेत आमचे जीवन समृद्ध करणारी ही मराठी भाषा. या मराठीचे बाळकडु लाभलेले आम्ही भाग्यवंत.*

        *आमचे जीवन आनंदी करणाऱ्या या सुसंस्कृत.. सुस्वभावी.. संपन्न मराठी भाषेचे आम्ही आजन्म ऋणी आहोत. आपणांस मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


संकलित 

माहिती आधारित 

साभार





 .     


                *२७.०२.२०२३*


🌻🔆🌸📚🌺📚🌸🔆🌻

Comments

Popular posts from this blog